रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते?
नुकताच १ जुलैला डॉक्टर्स डे होऊन गेला. महिन्याभरापूर्वी रामदेवबाबाने ॲलोपॅथी आणि डॉक्टर या दोहोंबद्दलही अनुद्गार काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला होता. नंतर जूनच्या मध्यावधीत “डॉक्टर तो भगवान के रूप होते हैं” असे म्हणत सारवासारव केली आणि आपणही लस घेणार असल्याचे सूतोवाच केले. असो. मुद्दा तो नाही. या चर्चांतून काही प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, पॅथी-पॅथींमधली (उपचारपद्धतींमधली) भांडणे ही आपल्या वृथा अभिमानाची आणि अज्ञानाची द्योतक आहेत हे शहाण्यासुरत्या …